नोव्हेंबर महिन्याचा रेशन कोटा
१६ ऑक्टोबर २०२५
नोव्हेंबर महिन्यात अंत्योदय अन्न योजनेच्या रेशन कार्डधारकांना प्रतिरेशनकार्ड ३५ किलो फोर्टिफाईड तांदूळ मोफत देण्यात येईल. प्राधान्यक्रम कुटुंबांना लाभधारकामागे ५ किलो फोर्टिफाईड तांदुळ मोफत देण्यात येईल.
एपीएल कार्डधारकांना प्रती कार्ड १२ किलो फोर्टिफाईड तांदुळ १२.५० रूपये दराने आणि १० किलो गहू प्रति कार्ड १०.०० रुपये दराने देण्यात येईल.
कल्याणकारी संस्थां योजना कार्ड धारकांना ६.१५ रूपये दराने १५ किलो फोर्टिफाइड तांदूळ आणि १५ किलो गहू ४.८० रूपये किलो दराने वितरीत करतील.
शालीमार वाहतूक कंत्राटदारांनी धान्य कोटा उचलून ३१ ऑक्टोबर पर्यंत स्वस्त धान्य दुकानदारांना पुरवठा करावा. रेशन कार्डधारकांनी आपला रेशन कोटा संबंधित स्वस्त धान्य दुकानातून उचलावा. धान्यासंबंधी कोणतीही तक्रार असल्यास रेशन कार्डधारकांनी संबंधित मामलेदार किंवा नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याकडे करावी.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७३५