६९ व्या राष्ट्रीय शालेय खेळांसाठी निवड चाचण्या
१४ ऑक्टोबर २०२५
६९ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५ साठी गोवा राज्य संघांची निवड करण्यासाठी कांपाल, पणजी येथील क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयातर्फे तायक्वांदोमध्ये १४ वर्षाखालील मुलांच्या निवड चाचण्या घेण्यात येणार आहे.
निवड चाचण्या १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत पणजीतील कांपाल येथील इनडोअर हॉल येथे होतील. यासाठी प्रभारी श्रीमती आंतोनेता पिंटो, एपीईओ, तिसवाडी मोबाईल क्रमांक ९८२२४८१८०५ आणि श्री तुलसीदास देसाई, टीएसओ मोबाईल क्रमांक ९९२३५००५१९ हे असतील.
१४ वर्षांखालील मुलांसाठी पात्रता अशी आहे की खेळाडूंचा जन्म ०१/०१/२०१२ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. निवडलेल्या खेळाडूंना पात्रता अर्जासह डॉक्टरांकडून वय पडताळणी चाचणी प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७३१