केळशी रेंजमध्ये लहान शस्त्रांचा गोळीबार प्रशिक्षण
८ ऑक्टोबर २०२५
शस्त्र प्रशिक्षण विभाग आयएनएस हंसा, दाबोळी येथे ९ आणि २९ ते ३० ऑक्टोबर २०२५ रोजी केळशी रेंज भागात लहान शस्त्रांचे गोळीबार प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. गोळीबार रेंज जवळच्या भागातील नागरिकांना आणि मालमत्तेस कोणताही धोका नसेल. गोळीबाराच्या आवाजाने रहिवाशांनी घाबरू नये असा सल्ला देण्यात येत आहे.
तथापि, केळशी रेंज लगतच्या समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास स्थानिक नागरिकांना मनाई आहे. तसेच मासेमारी नौका/मनोरंजन नौकाना केळसी रेंजच्या २ किलो मीटर समुद्रकिनाऱ्याच्या भागात बंदी असेल.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७३०