casibom giriş

बंद वाहनाविषयी दावे सादर करण्याची मागणी

७ ऑक्टोबर २०२५

भारतीय पोलीस कायदा, १८६१ च्या कलम २६ अंतर्गत दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सासस्टी येथील फातोर्डा परिसरातील वाहतूक विभागाच्या हद्दीत दीर्घकाळ पडून असलेल्या, सोडून दिलेल्या वाहनासंबंधी दावे सांगण्यास इच्छुक सर्व व्यक्तींना, कागदोपत्री पुराव्यांसह, आपले दावे घोषणेच्या प्रकाशन तारखेपासून सहा महिन्यांच्या आत उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी – १, मडगाव यांच्या कार्यालयात सादर करण्याचे आवाहन केले आहे.

जर निर्धारित कालावधीत अशा बेवारस वाहनाविषयी कोणतेही आक्षेप/दावे प्राप्त झाले नाहीत, तर वाहने राज्य सरकार आपल्या ताब्यात घेतील आणि सार्वजनिक लिलावाद्वारे त्यांची विल्हेवाट लावतील. दीर्घकाळ पडून असलेल्या वाहनांची यादी

ओळखल्या गेलेल्या वाहनांची यादी उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी – १, मडगाव यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७२६

Skip to content