२ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती
१ ऑक्टोबर २०२५
२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली जाईल. गोवा सरकार ग्राम पंचायत से ओल्ड गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुख्य राज्यस्तरीय कार्यक्रम गांधी चौक, जुने गोवा येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील आणि गांधींजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील.
सदर कार्यक्रमास केंद्रीय वीज, नवीन आणि नविनीकरण ऊर्जा राज्यमंत्री श्री श्रीपाद येसो नाईक, कुंभारजुवाचे आमदार श्री राजेश फळदेसाई, जुने गोवा सरपंच श्रीमती मेधा पर्वतकर, आणि जिल्हा पंचायत सदस्य श्री. सिद्धेश नाईक उपस्थित राहतील.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७०८