casibom giriş

राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना गांधी जयंती दिनाच्या शुभेच्छा

१ ऑक्टोबर २०२५

गोव्याचे राज्यपाल श्री. पी अशोक गजपती राजू यांनी गोव्यातील लोकांना गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेसात राज्यपाल म्हण तात,गांधी जयंतीच्या शुभ प्रसंगी मी गोव्यातील लोकांना हर्दिक शुभेच्या व्यक्त करतो. हा दिवस जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून पाळण्यात येतो. आज आपण आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहतो, ज्यांचे जीवन आणि सत्य, शांतता आणि अहिंसेचा संदेश मानवतेला प्रेरणा देते.

गांधीजींनी खरे धैर्य आक्रमकतेत नसते तर ते संयम आणि नैतिक बळाच्या सहाय्याने न्याय आणि योग्यतेचे समर्थन करण्याच्या क्षमतेत असते हे सिध्द केले आहे. व्देष किंवा हिंसाचाराशिवाय सत्य, प्रेम आणि करूमा तत्वाव्दारे गहन बदल घडवून आणता येतो हे त्यांनी जगाला दाखवून दिले आहे. त्यांचा वारसा आपल्याला आठवण करून देतो की शांतता ही कमकुवतपणा नाही तर शक्तीचे सर्वोच्च रूप आहे असे ते म्हणतात.

गांधीजींचे समावेशक विकासाचे स्वप्नही तितकेच महत्त्वाचे होते. “गांधीजींसाठी, राष्ट्राची प्रगती केवळ आर्थिक दृष्टीनेच नव्हे तर देशातील सर्वात गरीब माणसांच्या कल्याणाबाबतीत होती. विकास हा न्याय्य, समतापूर्ण आणि समावेशक असला पाहिजे हा त्यांचा विश्वास आजही आपल्यासाठी मार्गदर्शक आहे.

जगासमोर असहिष्णुता आणि विभाजनाच्या समकालीन आव्हानांचा सामना करावा लागत असताना, गांधीजींचे तत्वज्ञान संवादाद्वारे मतभेद सोडवणे, मतभेदांना समजुतीने बदलणे आणि विविधतेचा आदर करून एकता मजबूत करण्याची वाट दाखवितो.

“या गांधी जयंतीनिमित्त, आपण त्यांच्या आदर्शांकडे पुन्हा समर्पित होऊया. आपण आपले विचार आणि कृतीनी अहिंसेचा मार्गाचा स्वीकार करूया, आपल्या सर्व प्रयत्नांमध्ये सत्याचे समर्थन करूया आणि न्याय, समावेशकता आणि शांततेत रुजलेला समाज निर्माण करण्यासाठी एकत्र काम करूया. असे करून, आपण गांधीजींच्या दृष्टिकोनाचा आदर करूया आणि सुसंवादी आणि दयाळू भविष्यासाठी आपली सामूहिक जबाबदारी पुन्हा दृढ करूया असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७१३

Skip to content