गोव्यातील आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या कलाकृतीं संकलनासाठी देण्याचे आवाहन
२६ सप्टेंबर २०२५
फोंडा फर्मागुडी येथील आगामी आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचा एक भाग म्हणून आदिवासी संशोधन संस्थेने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रामाणिक कलाकृती, स्मृतिचिन्हे आणि वैयक्तिक वस्तूंचे संकलन करण्याचे काम सुरू आहे. फोंडा फर्मागुडी येथील आगामी आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयात या कलाकृती, स्मृतिचिन्हे आणि वैयक्तिक वस्तूंचे प्रदर्शन करण्यात येईल.
जर एखाद्या व्यक्तीकडे गोव्यातील आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांशी संबंधित अशा कोणत्याही कलाकृती, कागदपत्रे, छायाचित्रे, पत्रे किंवा वैयक्तिक वस्तू असतील तर त्यांनी पुढे येऊन त्या आदिवासी संस्थेकडे सुपूर्द करण्याची विनंती करण्यात येत आहे. हे योगदान त्यांचा वारसा जपण्यात आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण ठेवण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यांच्या त्यागाची आणि शौर्याची माहिती होण्यास महत्त्वाची भूमिका बजावेल.
आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांशी संबंधित कलाकृती, कागदपत्रे, दस्तावेज, छायाचित्रे, पत्रे किंवा वैयक्तिक वस्तू गोवा राज्य अनुसूचित जमाती वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, दुसरा मजला, दयानंद स्मृती इमारत, स्वामी विवेकानंद रोड, पणजी येथे आणून द्याव्या किंवा दान कराव्या.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६९३