राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना दुर्गा पूजेच्या शुभेच्छा
गोव्याचे राज्यपाल श्री. पुसापती अशोक गजपती राजू यांनी दुर्गापूजेच्या शुभ मुहूर्तावर गोव्यातील लोकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, दुर्गा पूजा हा संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा सर्वात आनंदाचा आणि महत्त्वाचा सण आहे. या शुभप्रसंगी स्त्री शक्ती, धैर्य आणि सद्गुणी मूर्त स्वरूपी देवी दुर्गेची पूजा करतात. हा दिवस म्हणजे वाईट प्रवृत्तीवर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे, देवी दुर्गा मातेने महिषासुरावर राक्षसावर विजय मिळवून विश्वात शांतता आणि सलोखा पुनर्संचयित केला.
हा उत्सव केवळ एक धार्मिक कार्यक्रम नाही तर एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे जो लोकांना आनंदाच्या प्रसंगी एकत्र आणतो. दुर्गा पूजा उत्सव आपल्या सर्वांमध्ये संकट आणि अन्यायावर मात करण्यासाठी असलेल्या शक्तीची आणि धैर्याची आठवण आठवण करून देतो.
“धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त, दुर्गा पूजा उत्सव एकता, सामाजिक बंधन आणि सांस्कृतिक वारसा वाढीस लावतो. या उत्सवाच्या प्रसंगी कुटुंबे आणि मित्र एकत्र येतात आणि समाजाकडून दयाळूपणा आणि देवाण घेवाणाचे कार्य होते. या उत्सवामुळे जात, पात आणि वयाच्या मर्यादा दूर होतात आणि परस्पर आदराची भावना वाढीस लागते.
दुर्गापूजा साजरी करताना, आपण देवी दुर्गा मातेचे धैर्य, करुणा आणि न्यायासाठी लढण्याची अढळ भावनेच्या मूल्यांवर चिंतन करूया. राज्यपालांनी या उत्सवातून आपल्याला आपल्या जीवनात हे गुण आत्मसात करण्याची आणि अधिक सलोखा आणि समावेशक समाजासाठी काम करण्याची प्रेरणा देवो
सर्वांना आनंदी आणि आशीर्वादित दुर्गापूजेच्या शुभेच्छा असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६८३