भारतातील आदिवासी समाज आणि विकास या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन
२५ सप्टेंबर २०२५
डीडी कोसंबी समाजशास्त्र आणि बिहेवियरल अभ्यास विध्यालयाच्या सामाज शास्त्र विभाग आणि सामाजिक अंतर्भाव अभ्यासाच्या यूजीसी केंद्राने, गोवा सरकारच्या आदिवासी कल्याण खाते आणि आदिवासी संशोधन संस्थेच्या सहकार्याने २६ सप्टेंबर २०२५ रोजी गोवा विद्यापीठाच्या सेमिनार हॉल ब्लॉक बी मध्ये भारतातील आदिवासी संस्था आणि विकास या विषयावर एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
आदिवासी कल्याण मंत्री श्री रमेश तवडकर, गोवा विद्यापीठाचे उपकुलगुरू श्री. प्रो. हरिलाल बी. मेनन आणि रजिस्ट्रार प्रा. सुंदर धुरी, आदिवासी कल्याण सचिव श्रीमती चेस्टा यादव (आयएएस), आदिवासी कल्याण संचालक श्री. दीपक देसाई, आदिवासी संशोधन संस्थेचे संचालक श्री. सागर गावडे, डीडी कोसंबी स्कूल ऑफ सोशल सायन्स अँड बिहेवियरल स्टडीजचे डीन प्रा. नागेंद्र राव आणि डीडी कोसंबी स्कूल ऑफ सोशल सायन्स अँड बिहेवियरल स्टडीज विध्यालयाचे समाज शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. नागेंद्र राव, डॉ. अरविंद एन. हळदणकर हे या चर्चासत्रात सहभागी होतील.
प्रो. व्हर्जिनियस झा, प्रो. एन. सुकुमार, प्रो. सुकांत चौधरी, पद्मश्री विनायक खेडेकर आणि डॉ. पांडुरंग फळदेसाई. परिसंवादात भाग घेतील.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६९०