casibom giriş

दक्षिण गोव्यात रस्ते खोदण्यास बंदी

२५ सप्टेंबर २०२५

माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण खात्याने कळवले आहे की रस्त्याच्या कडेला घातलेले ऑप्टिकल फायबर केबल जवळ कोणत्याही खोदकाम केल्यास दूरसंचार नेटवर्कमध्ये गंभीर व्यत्यय येऊ शकतो ज्यामुळे २६ आणि २७ सप्टेंबर २०२५ रोजी नियोजित माननीय पंतप्रधानांच्या ४जी उद्घाटन कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या दळणवळण सुविधा खंडित होऊ शकतात. म्हणून सार्वजनिक बांधकाम खाते, वीज, पाणीपुरवठा, सांडपाणी, गॅस पाइपलाइन, नगरपालिका, पंचायती, दूरसंचार, आयएसपी ऑपरेटर आणि खाजगी कंत्राटदारांसह सर्व संबंधित खाते, एजन्सींना वरील कालावधीत दक्षिण गोवा जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे खोदकाम, खंदकीकरण किंवा रस्ता खोदण्याचे काम थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६८६

Skip to content