आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सव २०२५ साठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना आमंत्रण
२३ सप्टेंबर २०२५
दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण मंत्री श्री सुभाष फळदेसाई यांनी राज्य दिव्यांग व्यक्ती आयोगाचे सचिव श्री ताहा हाझिक यांच्यासमवेत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्री श्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सव २०२५ मध्ये सहभागी होण्यासाठी औपचारिक आमंत्रण दिले.
श्री. फळदेसाई यांनी श्री. नड्डा यांना पर्पल फेस्टच्या मागील दोन वर्षाच्या आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवाची माहिती दिली. श्री फळदेसाई यांनी या महोत्सवानिमित्ताने आयोजित करण्यात येणाऱा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आणि दिव्यांग व्यक्तीच्या सशक्तीकरणासाठी मदत झाल्याचे सांगितले.
गोवा सरकारने दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सशक्तीकरणासाठी केलेल्या कार्याने प्रभावित होऊन कार्याचे कौतुक केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५ मध्ये सहभागी होण्यास उत्सुकता दर्शविली आणि दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणकारी कार्यास केंद्र सरकारकडून संपूर्ण सहकार्य देण्याचे सांगितले.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६७३