आमोणा येथे महिलांसाठी आरोग्य शिबीर आणि स्पर्धा संपन्न
२२ सप्टेंबर २०२५
आमोणा ग्रामपंचायतीने आमोणाच्या आयुष्मान आरोग्य मंदिराच्या सहकार्याने “स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान” या संकल्पनेअंतर्गत आमोणाच्या महिला आणि शाळांमधील विद्यार्थिनींसाठी आरोग्य शिबिर आणि स्पर्धा आयोजित केल्या होत्या. सध्या सुरू असलेल्या “सेवा पखवाडा” च्या कार्यक्रमाचा हा एक भाग होता.
या शिबिरात गावातील महिला आणि मुलींची मोठी उपस्थिती होती. त्यांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला आणि पौस्टिक लाडू बनविण्याच्या स्पर्धेत सक्रिय सहभाग घेतला. याव्दारे पोषण आणि महिला सशक्तीकरणासंबंधी माहिती मिळण्यास मदत होते.
या प्रसंगी बोलताना सरपंच श्री सागर फडते यांनी आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा २.० सारखे उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचविल्याबद्दल गोवा सरकारचे आभार मानले. पंचायतीला आरोग्य आणि पोषण जागरूकतेद्वारे महिलांना सक्षम बनविणे आणि कुटुंबांना बळकटी देणे यामुळे शक्य झाले असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला पंच सदस्या श्रीमती दिया सावंत आणि श्रीमती अनिशा आमोणकर, स्वयंपूर्ण मित्र श्री रोहन घाडी आणि गोवा सरकारच्या आरोग्य खात्याच्या डॉ. शांभवी गाडगीळ उपस्थित होत्या.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६६९