मुख्यमंत्र्यांकडून गोव्यातील लोकांना मिलाद-उन-नबीनिमित्त शुभेच्छा
४ सप्टेंबर २०२५
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना विशेषतः मुस्लिम बांधवांना मिलाद-उन-नबीनिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, हा दिवस भक्तीभावाने, प्रार्थना आणि सद्भावनेने साजरा करतात. हा दिवस लोकांना एकत्र आणण्यास आणि बंधुत्वाचे बंधन मजबूत करण्यास मदत करील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आणि ईद-ए-मिलाद (मिलाद-उन-नबी) च्या या शुभ प्रसंगी मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो असे ते आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.
मा/वाप/दिबां/ऑपी//रना/ २०२४/६३४