casibom giriş

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि विध्यावेतन योजना

४ सप्टेंबर २०२५

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण संचालनालयाच्या वतीने विविध शाळा, महाविद्यालये, संस्था इत्यादींमध्ये शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विध्यावेतन आणि शिष्यवृत्ती देण्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येते.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २०० रुपये विध्यावेतन आणि नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति महिना ३०० रुपये विध्यावेतन ११ महिन्यांसाठी देण्यात येईल. विद्यापीठ अभ्यासक्रमांनुसार नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी डे स्कॉलरसाठी ११ महिन्यांसाठी दरमहा ५०० रुपये, वसतिगृहात राहणाऱ्यांसाठी ११ महिन्यांसाठी दरमहा २०० रुपये आणि अंधांसाठी वाचक भत्ता ११ महिन्यांसाठी ७५ रुपये असेल. बीए/बी.कॉम/बीएससीच्या विद्यार्थ्यांना डे स्कॉलरसाठी ११ महिन्यांसाठी दरमहा ६५० रुपये, वसतिगृहात राहणाऱ्यांसाठी ११ महिन्यांसाठी दरमहा २७० रुपये आणि अंधांसाठी वाचक भत्ता ११ महिन्यांसाठी दरमहा ११५ रुपये मिळेल. बीई/बी.एआर्क/एमबीबीएस/एलएलबी/बी.एड/प्रोफेशनल आणि इंजिनिअरिंग कोर्सेसमध्ये डिप्लोमा इत्यादी आणि एमए/एमएससी/एम.कॉम/एलएलएम/एमईडी यांना डे स्कॉलरसाठी ११ महिन्यांसाठी दरमहा ९००/- रुपये, वसतिगृहात राहणाऱ्यांसाठी ११ महिन्यांसाठी दरमहा ३६०/- रुपये आणि अंधांसाठी वाचक भत्त्यासाठी दरमहा १५०/- रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल.

विद्यार्थ्यांकडे किमान ४०% आणि त्याहून अधिक दिव्यांगत्व असणे आवश्यक आहे आणि त्यांना वैद्यकीय मंडळाने योग्यरित्या प्रमाणित केलेले असावे. विद्यार्थ्यांनी मागील वार्षिक परीक्षेत किमान ४५% आणि त्याहून अधिक गुण मिळविलेले असावे. विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. १,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्रतेसाठी समाज कल्याण संचालनालयाने जारी केलेले यूडीआयडी कार्ड हा एक निकष आहे. मान्यताप्राप्त शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठातून संगीत आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेण्यासाठीही शिष्यवृत्ती दिली जाते.

या योजनांअंतर्गत फक्त ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील आणि ऑफलाइन अर्जांसाठी कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही. दिव्यांग व्यक्तींसाठी २०२५-२६ या वर्षासाठी मुख्यमंत्री शिष्यवृत्ती पोर्टल cmscholarship.goa.gov.in वर विद्यार्थ्यांची नोंदणी आधीच सुरू झाली आहे. दिव्यांग व्यक्तींना शिष्यवृत्ती देण्यासाठी नोंदणी आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२५ अशी आहे.

अधिक माहितीसाठी, दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण खात्याशी दूरध्वनी क्रमांक ०८३२-२९१२६०१, ईमेल: dir-depwd@goa.gov.in वर संपर्क साधावा.

मा/वाप/दिबां/ऑपी//रना/ २०२४/६३३

Skip to content