राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याकडून नववर्षाच्या शुभेच्छा

पणजी: ३० डिसेंबर २०२३

गोव्याचे राज्यपाल श्री. पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोमंतकीयांना, नववर्ष २०२४च्या आनंददायी प्रसंगी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे, की “नवीन वर्ष हा आनंदाचा वेळ आहे जेव्हा, आपण आपले विचार ताजे करून नवीन कामगिरीसाठी तयारी करतो. ही अशी वेळ आहे, जेव्हा आपण आपल्या जीवनात सुधारणा आणण्याचा संकल्प करतो. नवीन वर्ष आपल्या आयुष्यात नवीन आशा, आकांक्षा, अपेक्षा व नवचैतन्य घेऊन येते.

एकमेकांमधील मतभेद दूर करून, कटुता माफ करून, प्रेम वाढवणे आणि समाजातील सहकारी सदस्यांसोबतची आपली मैत्री अधिक दृढ करण्याची, ही सर्वोत्तम वेळ आहे. त्यामुळे गोव्यातील जनतेने एकात्मतेने राहून, आपल्या राज्याची सद्भावना आणि सामाजिक एकता टिकवून ठेवून आपली वचनबद्धता कायम ठेवावी, असे आवाहन राज्यपाल श्री. पिल्लई यांनी केले आहे. गोवा हे नेहमीच शांतता, सुसंवाद आणि सहिष्णुतेचे प्रतीक राहिले आहे. हा वारसा जपण्याचा आणि तो समृद्ध करण्याचा तसेच एकमेकांचे सुख-दु:ख वाटून घेण्याचा आमचा प्रयत्न असायला हवा.

हे नववर्ष आपल्यात एकता आणि करुणेची भावना पुन्हा जागृत करून शांती आणि सुसंवाद वाढवू देत, असेही राज्यपालांनी शेवटी आपल्या संदेशात म्हटले आहे.

DIP/NB/PN/SF/2023/

Skip to content