कोविड योद्यांसाठी लसीकरण मोहीम
दिनांकः २४ फेब्रुवारी २०२१
उत्तर गोव्यातील सर्व तालुक्यांमध्ये कोविड योद्यांसाठी आजपासून लसीकरण मोहीमेला सुरूवात होत आहे. दि. २४ ते २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे.
ही मोहीम सकाळी ९ ते ५ पर्यंत चालणार आहे. डिचोली तालुक्यात केशव सेवा साधना, सर्वण येथे दि. २४ आणि २६ फेब्रुवारी रोजी लस देण्यात येईल तर वाळपई येथील आरोग्य केंद्रात आणि सरकारी प्राथमिक विद्यालय, मुमूसे, तुये पेडणे येथे दि. २४ रोजी ही मोहीम राबवली जाईल. बार्देश महालातील पेडे क्रिडा प्रकल्प म्हापसा वीसी-I; गोवा क्रिडा प्राधिकरण पेडे वीसी-II; विद्या प्रबोधिनी हायस्कूल, पर्वरी आणि सेंट झेवियर हायस्कूल, शिवोली येथे २४, २५, २६ आणि २७ या दिवसांमध्ये लसीकरण करण्यात येईल.
तिसवाडी महालात किर्लवाडा प्राथमिक विद्यालयात दि. २४ फेब्रुवारी रोजी लस देण्यात येईल. त्याचप्रमाणे खोर्ली आरोग्य केंद्रात २४, २५ आणि २६ तारखेला ही मोहीम राबवली जाईल. दि. २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी कांपाल पणजी येथील अग्निशमन दलाच्या कचेरीमध्ये लसीकरणाचा कार्यक्रम होईल. मंडूर आरोग्य केंद्र, पोलीस मेस आल्तिनो, सांताक्रूज हायस्कूल आणि काझा दी पोवा, ताळगांव येथे दि. २४, २५. २६, आणि २७ रोजी लसीकरण केले जाईल. आणि पणजी महानगरपालिका, केंद्रीय सरकारी प्राथमिक शाळा, पणजी, येथे दि. २५, २६,२७ व २८ रोजी लसीकरण होईल.
कोविन पोर्टलवर आपले नाव नोंद केलेल्या सर्व कोविड योद्यांनी त्याच्या सोईनुसार आपली ओळखपत्रे दाखवून लस घ्यावी असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.
असे माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.
मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/२०८