मत्स्योद्योग खात्यातर्फे प्रशिक्षण अभ्यासक्रम
तारीख : १९ फेब्रुवारी २०२१
मत्स्योद्योग खात्यातर्फे एला धावजी, ओल्ड गोवा येथील मासेमारी प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध प्रकारचे अल्प मुदतीचे प्रशिक्षण अभ्यासक्रम घेण्यात येणार आहेत.
दि. २३/०२/२०२१आणि २४/०२/२०२१ रोजी जास्त नफा मिळविणार्या माशांची पैदास करण्यावर प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख दि. २२/०२/२०२१ आहे. दि. ०१/०३/२०२१ आणि ०२/०३/२०२१ रोजी खार्या पाण्यातील कोळंबी पैदास करण्याविषयीचे प्रशिक्षण देण्यात येईल व त्यासाठी नोंदणी करण्याची तारीख २६/०२/२०२१ ही असेल. त्याचप्रमाणे, मुक्त समुद्री संस्कृती आणि शिंपले संस्कृती विषयी दि. ०९/०३/२०२१ आणि १० /०३/२०२१ रोजी प्रशिक्षण देण्यात येईल व त्यासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख दि. ०८/०३/२०२१ ही असेल.
या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यास इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज वरील तारखांच्या दिवशी किंवा अगोदर संध्याकाळी ५.३० पर्यंत खात्याच्या कार्यालयात पोहोचवावे. अधिक माहितीसाठी ०८३२-२२२४८३८ किंवा ईमेलःdir-fish.goa@nic.in वर संपर्क साधावा.
मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१९६