राष्ट्रीय इंडियन मिलिट्री कॉलेज(आरआयएमसी) प्रवेश परीक्षेसाठी अर्ज

तारीख : १५ फेब्रुवारी २०२१

राष्ट्रीय भारतीय लष्कर महाविद्यालय (आरआयएमसी) देहरादून(यूके) च्या जानेवारी २०२२ सत्रासाठी संबंधित राज्यांतील केंद्रांमध्ये घेतल्या जाणार्‍या ८वी च्या प्रवेश परीक्षेसाठी मुलांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

ही परीक्षा देऊ इच्छिणार्‍या उमेदवारांचे(केवळ पुरूष) वय दि. १ जानेवारी, २०२२ रोजी अकरा वर्षे आणि सहा महिन्यांपेक्षा कमी आणि तेरा वर्षांपेक्षा जास्त नसावे म्हणजेच ते २ जानेवारी २००९ च्या आधी आणि १ जुलै २०१० च्या नंतर जन्मलेले नसावे.

आरआयएमसीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार दि. १ जुलै २०२१ रोजी एकतर ७वी इयत्तेत शिकणारे असावे किंवा एखाद्या मान्यताप्राप्त विद्यालयातून उत्तीर्ण झाले असावे.

दि. ५ जून २०२१ रोजी गणित (सकाळी ९.३० ते ११.००वाजेपर्यंत), सामान्य ज्ञान(दुपारी १२.०० ते १ पर्यंत) आणि इंग्रजी (दु. २.३० ते ४.३० पर्यंत) अशा लेखी परिक्षा घेतल्या जातील ज्यांच्या वेळेत कोविड-१९ मुळे बदलही शक्य आहे. या परीक्षेत प्रत्येक विषयात किमान ५०% गुण मिळविणे आवश्यक असेल.

तोंडी परीक्षा गुरूवार दि. ६ ऑक्टोबर २०२१ रोजी घेतली जाईल जिच्या वेळेतही कोविड-१९ मुळे बदल शक्य आहे आणि जे उमेदवार लेखी परीक्षेत उत्तीर्ण होतील त्यांच्यासाठी मुलाखत असेल. या मुलाखतीमध्येही ५०% गुण मिळविणे आवश्यक असेल आणि या मुलाखतीचे स्थळ प्रत्येक राज्यातर्फे सप्टेंबर २०२१ च्या पहिल्या आठवड्यात कळविण्यात येईल. उमेदवारांचे बौद्धिक ज्ञान, व्यक्तिमत्व आणि संभाषण कौशल्य यांचा विचार तोंडी परीक्षेत केला जाईल.

मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवडक मिलिटरी हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी होईल. आणि जे उमेदवार या तपासणीमध्ये तंदुरूस्त आढळतील त्यांनाच आरआयएमसीमध्ये प्रवेश दिला जाईल.

केंद्रीय सरकारच्या कर्मचार्‍यांची मुले कर्मचार्‍याच्या नियुक्तीच्या/राहत्या राज्यातील ठिकाणी त्यांच्या परीक्षा आणि तोंडी परीक्षा देऊ शकतात. परंतु, त्यांची उमेदवारी त्यांच्या मूळ राज्यातील म्हणूनच गृहित धरली जाईल. त्यासाठी, ज्या राज्यामध्ये परीक्षा घेतल्या जातील तिथेच अर्ज सादर करणे बंधनकारक असेल.

लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचीच तोंडी परीक्षा घेतली जाईल. आरआयएमसी तर्फे आर्मी ट्रेनिंग कमांड, मुख्यालयातून मान्यता मिळालेली यादी संबंधित राज्य सरकारकडे पाठविली जाईल. सर्व पात्र उमेदवारांनी त्यांच्या इमेल पत्त्यावर सूचना मिळाल्याच्या १० दिवसांमध्ये आरआयएमसीमध्ये दाखल होणे गरजेचे आहे.

सर्वसाधारण उमेदवारासाठी सध्याचे वार्षिक शुल्क रू. १०७५००/-असून अनु. जाती/अनु. जमातीसाठी ९३९००/- आहे जे वेळोवेळी वाढू शकते. प्रवेशाच्यावेळी वार्षिक शुल्काच्या बरोबरीने रू. ३०,०००/- अनामत रक्कम भरावी लागेल जी उमेदवार पदवीधर झाल्यावर परत केली जाईल.

विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांसाठी रू. १०,०००/- ते रू. ५०,०००/-पर्यंतची शिष्यवृत्तीही देण्यात येईल. माहिती पुस्तिका तसेच विहित नमुन्यातील अर्ज आणि जुन्या प्रश्नपत्रिकांची पुस्तिका राष्ट्रीय भारतीय लष्कर महाविद्यालय, गारनी, कॅन्ट, देहरादून उत्तराखंड, २४८००३ सर्वसामान्य उमेदवारांनी आरआयएमसीच्या www.rimc.gov.in संकेतस्थळवर ऑनलाईन रू.६००/- तर एसी/एसटी उमेदवारांनी रू. ५५५/- भरून मिळविता येतील. ही कागदपत्रे “द कमांडंट, आरआयएमसी देहरादूनच्या नावे भारतीय स्टेट बँक, टेल भवन देहरादून(कोड ०१५७६) यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट काढून ही मिळविता येतील.

सर्व अर्ज दोन फोटो, रहिवासी दाखला, जन्म दाखला, एसटीएससी प्रमाणपत्र आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापकांची सही असलेले जन्मतारीख दर्शविणारे पत्र इत्यादी सर्व दस्तऐवजांसह राज्य सरकारकडे पाठविले पाहिजेत. अर्ज राष्ट्रीय भारतीय लष्कर महाविद्यालयात पाठवू नयेत. अधिक माहिती फॅक्स क्र. 0135-2754260 आणि ईमेल आयडी rimcollege@yahoo.com

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१७७

Skip to content