१३ फेब्रुवारी २०२६
माहिती आणि प्रसिध्दी खात्याने १९ फेब्रुवारी २०२६ रोजी फर्मागुढी फोंडा येथे आयोजित राज्य पातळीवरील महान मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन आणि कार्यावर हायस्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी अखिल गोवा नाट्य प्रवेश स्पर्धा आणि आंतर महाविद्यालयीन प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा सकाळी ९.०० वाजल्यापासून फर्मागुढी येथील श्री गणपती देवस्थानाच्या प्रांगणात होईल.
नाट्यप्रवेश सादरीकरणासाठी जास्तीत जास्त ५ मिनिटांचा कालावधी दिला जाईल. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे अनुक्रमे रुपये १०,०००/-, रुपये ७०००/- आणि रु. ५०००/- अशी रोख बक्षीस आणि प्रमाणपत्रे दिली जातील. त्याचप्रमाणे प्रत्येकी रुपये २०००/- ची दोन उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जातील.
आंतर महाविध्यालयीन प्रश्न मंजुषा स्पर्धेत प्रत्येक महाविद्यालयाना दोन विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. पहिल्या स्पर्धकांसाठी प्राथमिक फेरी होईल आणि अंतिम फेरीसाठी ५ संघांची निवड केली जाईल. विजेत्यांना प्रथम पारितोषिक रुपये ७,५००/-, व्दितीय पारितोषिक रुपये ५,०००/-, तृतीय पारितोषिक रुपये ३,०००/- आणि प्रत्येकी रुपये ५००/- ची दोन उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जातील.
नाट्य प्रवेश आणि प्रश्न मंजुषा स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपल्या प्रवेशिका १७ फेब्रुवारी २०२६ पूर्वी कार्यालयीन वेळेत माहिती आणि प्रसिद्धी खात्याकडे सादर कराव्या. अधिक माहितीसाठी माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे श्री श्याम गावकर यांच्याशी ९४२२४४४६२४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१३३

