Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

१ ऑक्टोबर २०२५

सेवा पंखवाडा २०२५ च्या निमित्ताने, उत्तर गोवा जिल्हा मिनरल फाउंडेशन (ट्रस्ट), ग्राम पंचायत पिर्णा आणि श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक शाळा आणि विद्यालय यांनी नुकतेच पिर्णा, बार्देश येथे स्वच्छता मोहीम आयोजित केली. पिर्णाचे सरपंच श्री संदीप शेट तानावडे, सचिव आणि पंचायत सदस्य श्री उमेश नाईक, प्राचार्य, श्रीमती रजनीता सावंत, मुख्याध्यापिका, कर्मचारी आणि विद्यार्थी आणि गोवा मिनरल फाउंडेशनचे सीईओ डॉ. सचिन तेंडुलकर या मोहिमेला उपस्थित होते.

या प्रसंगी, समुदायासाठी शाश्वत कचरा व्यवस्थापन पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी व्यापक ग्राम कचरा व्यवस्थापन योजना विकसित करण्याबाबत पंचायत सदस्यांशी चर्चा करण्यात आली.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७१५

Skip to content