Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

४ एप्रिल रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धेचे आयोजन

३१ मार्च २०२६

अग्निशमन सेवा संचालनालयाने १४ एप्रिल, २०२६ रोजी राज्यभरातील विविध अग्निशमन केंद्रांवर शालेय विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा वय ७ ते १० वर्षे आणि वय ११ ते १४ वर्षे अशा दोन गटांत आयोजित करण्यात येईल. पहिल्या गटासाठी “’थांबा, खाली बसा आणि घरंगळा – आगीपासून सुरक्षित आणि दुसऱ्या गटासाठी “’अधिक सुरक्षित समाजासाठी अग्निसुरक्षा जागरूकता’ असा विषय आहे. स्पर्धेचा कालावधी दोन तासांचा असेल, सकाळी १०:३० ते दुपारी १२:३० पर्यंत.

पोस्टर स्पर्धा डिचोली येथील छत्रपती शिवाजी महाराज सरकारी उच्च माध्यमिक शाळा, काणकोण येथील सरकारी उच्च माध्यमिक शाळा, कुंकळी येथील इन्फंट जीझस उच्च माध्यमिक शाळा, कुडचडे येथील सर्वोदय एज्युकेशनल सोसायटी, वागळे उच्च माध्यमिक शाळा, मंगेशी आणि न्यू इंग्लिश उच्च माध्यमिक शाळा, मानस वाडा, कुंडई, म्हापसा येथील एडीईआय शाळा, हनुमान नाट्यग्रहासमोर, मडगाव येथील रवींद्र भवन, , ओल्ड गोवा येथील ओल्ड गोवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट शाळा, पणजी येथील डॉन बॉस्को उच्च माध्यमिक शाळा, पेडने येथील सरकारी हायस्कुल एडीईआय कार्यालयाजवळ, पिळर्ण येथील डॉन बॉस्को हायस्कूल, कळंगुट, सेंट ॲलेक्स चर्चजवळ, फोंडा येतील आल्मेदा हायस्कूल, पर्वरी येथील ट्रायम्फ हायस्कूल, संजय शाळेजवळ, वाळपई येथील सरकारी प्राथमिक शाळा, एडीईआय कार्यालयाजवळ, वास्को येथील पंचायत हॉल, चिखली, वेर्णा येथील म्हाळसा हायस्कूल येथे होईल.

१४ एप्रिल २०२६ रोजी १०:०० वाजता, पणजी येथील गोवा राज्य अग्निशमन दल मुख्यालयात होणाऱ्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनाच्या कार्यक्रमात विजेत्यांचा सत्कार केला जाईल.

संचालनालयाने शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांना या उपक्रमात सक्रियपणे सहभागी होण्याचे आणि आग प्रतिबंध व सुरक्षा पद्धतींबद्दल जागरूकता निर्माण करण्यास योगदान देण्याचे आवाहन केले आहे.

मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/२१९

Skip to content