Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

२ फेब्रुवारीपासून तुये येथे ओपीडी सेवा सुरू होणार

३१ जानेवारी २०२६

गोव्याच्या उत्तर भागात आरोग्य सुविधा मजबूत करण्यासाठी, सरकारने तुये येथील नव्याने स्थापन झालेल्या रुग्णालय सुविधेला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न सुविधा म्हणून घोषित केले आहे. यापुढे या सुविधेला तुये सरकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र असे संबोधले जाईल.

या नवीन सुविधेतील बाह्यरुग्ण विभाग सेवा २ फेब्रुवारी २०२६ पासून गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य सेवा संचालनालयाच्या डॉक्टरांकडून खालील ओपीडी सेवांसह सुरू होतील.

औषधोपचारासाठी डॉ. सागर एस, शस्त्रक्रियेसाठी डॉ. वरुण शेट्टी आणि ऑर्थोपेडिकसाठी डॉ. साईल खोरजुवेंकर हे सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी उपलब्ध असतील . स्त्रीरोगशास्त्रासाठी डॉ. रुक्मा प्रभू गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी आणि डॉ. रूपमा साळगावकर सोमवार, मंगळवार आणि बुधवारी उपलब्ध असतील. दंतवैद्य, डॉ. मनस्वी आळवे, बालरोगतज्ञ, डॉ. सोनाली कुटे आणि फिजिओथेरपिस्ट, निकिता साटेलकर दररोज उपलब्ध असतील.

शनिवारी नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अश्विन डिसूझा उपलब्ध असतील. मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी आयुष, डॉ. अजित मटकर उपलब्ध असतील. सोमवार आणि शुक्रवारी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. योगीराज आनंद आणि ओटीओलॅरिंगोलॉजी (ईएनटी) डॉ. साईनाथ पेडणेकर उपलब्ध असतील. बुधवारी रेडिओलॉजिस्ट डॉ. मोहिनी सरदेसाई उपलब्ध असतील. मंगळवारी डॉ. यास्मीन नदाफ त्वचारोग, वेनेरिओलॉजी आणि कुष्ठरोग हाताळतील.
मा/वाप/ दिबा /एपी/र ना/२०२६

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/८६

Skip to content