latest EventsLatest NewsMarathi Press ReleasePress Releases

१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती.

१० एप्रिल २०२६

समाज कल्याण संचालनालय आणि गोवा राज्य अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि इतर खात्यांच्या सहकार्याने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५  वी जयंती १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता पणजी येथील केटीसी बस स्थानकाजवळील डॉ. आंबेडकर पार्कमध्ये साजरी करण्यात येईल.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा विधानसभेचे सभापती डॉ. गणेश गावकर, समाजकल्याण मंत्री श्री. सुभाष फळदेसाई आणि इतर मान्यवर डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील.

कार्यक्रमानंतर मान्यवरांची भाषणे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होईल.

मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/२३१

Skip to content