१३ ते २१ फेब्रुवारी पर्यंत विद्यार्थी संसद स्पर्धा
१२ फेब्रुवारी २०२६
पर्वरीतील गोवा विधिमंडळ सचिवालयाने गोवा विधिमंडळ मंचाच्या सहकार्याने १३ ते २१ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पीएसी-पीयूसी कक्ष, विधानसभा प्रकल्प, पर्वरी येथे २०२५-२६ वर्षासाठी विद्यार्थी संसद स्पर्धा आयोजित केली आहे. विद्यार्थी समुदायामध्ये स्वयंशिस्त, अभिव्यक्तीचा अधिकार, इतरांच्या मतांबद्दल सहिष्णुता, सुधारित वादविवाद आणि लोकशाही जीवनशैलीच्या विविध गुणांशी स्वतःला परिचित करून देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली जाते. गोवा राज्यातील एकूण १९ महाविद्यालये विद्यार्थी संसद स्पर्धा, २०२६ मध्ये सहभागी होतील.
विद्यार्थी संसद स्पर्धा २०२६ चा उद्घाटन समारंभ १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता गोवा विधानसभेचे सभापती डॉ. गणेश गांवकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१३०

