१२ फेब्रुवारी रोजी मतदार यादी निरीक्षकाची भेट
१० फेब्रुवारी २०२६
मतदार यादी निरीक्षक सर्वसामान्य लोकांचे कोणतेही दावे/प्रस्न असल्यास ते स्वीकारण्यासाठी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्या ४.०० वाजता दक्षिण गोवा माथानी साल्ढाणा प्रशासकीय प्रकल्पातील परिषदगृहात खोली क्रमांक ४०७ चौथा मजला येथे उपलब्ध असतील.
नवी दिल्लीतील भारतीय निवडणूक आयोगाने महसूल सचिव श्री. संदीप जॅकीस, आयएएस यांची गोवा राज्यासाठी मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
लोकांचे कोणतेही दावे/प्रस्न असल्यास ते स्वीकारण्यासाठी सर्वसामान्य लोक चेंबर क्रमांक २०५, तिसरा मजला, सचिवालय, पर्वरी, बार्देश-गोवा, ४०३५२१ येथेही त्यांच्या कार्यालयांत संपर्क साधू शकतात किंवा त्यांच्याशी फोन क्रं. ०८३२–२४१९४२०, २४१९६४६ वर संपर्क करू शकतात.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१२२

