१२ एप्रिल रोजी साळावली जल प्रकल्पातून पाणीपुरवठा बंद
१० एप्रिल २०२६
दक्षिण गोव्यातील शेल्डे उपकेंद्रावरून १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.०० ते संध्या ४.०० वाजेपर्यंत दुरूस्ती कामासाठी वीज पुरवठा बंद करण्यात येईल आणि त्यामुळे १२ एप्रिल २०२६ रोजी १६० एमएलडी आणि १०० एमएलडी साळावली जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जाणार नाही आणि १३ एप्रिल २०२६ रोजी १६० एमएलडी आणि १०० एमएलडी साळावली जलशुद्धीकरण प्रकल्पातून मर्यादित प्रमाणात पाणी पुरवठा होईल. त्यासाठी वरील काळात सांगे, केपे, सासस्टी आणि मुरगांव तालुक्यांमध्ये पाणी पुरवठ्यावर परिणाम होईल. ग्राहकांनी याची नोंद घ्यावी असे पाणी पुरवठा खात्याने कळविले आहे.
मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/२३२
