Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना नोकरी देण्याची योजना नोकरीसाठी नोंदणी करण्याची शेवटची संधी

१६ मार्च २०२६

गृह खात्याने स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरी देण्याच्या योजनेखाली नोकरीसाठी नोंदणी करण्याची शेवटची संधी जाहीर केली आहे. गृह खात्याने २०१३ रोजी स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरी देण्याच्या योजना अधिसूचित केली होती. या योजनेखाली नोंदणी केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पात्र मुलांना विविध सरकारी खात्यांमध्ये नोकरी दिल्या आहेत.

परंतु असे निदर्शनास आले आहे की कांही स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलानी विविध कारणांमुळे या योजनेखाली नंदणी केलेली नाही. त्यासाठी गृह खात्याने स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना या योजनेखाली नोंदणी करण्यास शेवटची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या अशा सर्व मुलांनी या योजनेखाली नोंदणी करण्यासाठी अर्ज मिळविण्यासाठी वडिलांच्या किंवा आईच्या स्वातंत्र्य सैनिक दाखल्यासह १७ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत गृह खाते, सचिवालय पर्वरी येथे संपर्क साधावा. उशीरा पोचलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही आणि या योजनेखाली नोंदणी करण्यास ही शेवटची संधी असेल.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१८७

Skip to content