स्वर्गीय पर्रीकर यांची जयंती साजरी
१३ डिसेंबर २०२५
गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षण मंत्री स्व. श्री मनोहर पर्रिकर यांची ७० वी जयंती सरकारतर्फे साजरी करण्यात आली. यानिमित्त आज मनोहर पर्रीकर स्मृती स्थळ मिरामार येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भारताचे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासमवेत समाधी स्थळावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमाला मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू, आयएएस, उत्तर गोवा जिल्हाधिकारी श्री अंकित यादव, आयएएस, पोलिस महानिरीक्षक श्री केआर चौरसिया, आयपीएस, पर्रीकर यांचे पुत्र श्री उत्पल पर्रीकर व त्यांचे कुटुंबीय आणि इतर उपस्थित होते.
मा वाप दिबा एपी र ना २०२५.

