साळावली जल प्रकल्पातून मर्यादित प्रमाणात जल पुरवठा
६ जानेवारी २०२६
शेळपे- सांगे येथील जलशुध्दीकरण प्रकल्पावर ७ जानेवारी रोजी सकाळी ९ ते संध्या ७ वाजेपर्यंत दुरूस्ती काम हाती घेण्यात येणार असल्याने १६० एमएलडी साळावली जल प्रकल्पातून पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. १०० एमएलडी साळावली जल प्रकल्पातून नेहमीप्रमाणे पाणी पुरवठा केला जाणार आहे. या दुरूस्ती कामामुळे ७ व ८ जानेवारी रोजी सांगे,केपे, मुरगांव व सासष्टी या चार तालुक्यात मर्यादित प्रमाणात पाणी पुरवठा होईल.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१५

