latest EventsLatest NewsMarathi Press ReleasePress Releases

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सन्मानार्थ पणजीत एकता पदयात्रा संपन्न

१२ नोव्हेंबर २०२५

क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाने आयोजित केलेल्या उत्तर गोवा जिल्हास्तरीय ‘सरदार @ १५० एकता दौड’ पदयात्रेला आज पणजीमध्ये हिरवा झेंडा दाखविण्यात आला. विविध शैक्षणिक संस्था आणि एनएसएस विभागांचे विद्यार्थी पणजीतील आझाद मैदानावर एकत्ता दौड सुरू होऊन मिरामार सर्कल येथे पदयात्रेचा समारोप झाला. विद्यार्थ्यांना यावेळी आत्मनिर्भर भारताची प्रतिज्ञा देण्यात आली. राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘वंदे मातरम’ हे गीत गाण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष श्री धाकू मडकईकर होते. त्यांनी विद्यार्थ्यांना एक चांगला समाज, मजबूत आणि एकात्म राष्ट्र निर्माण करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांचे आदर्श आणि मूल्यांचे आचरण करण्याचे आवाहन केले.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कामगिरीचे स्मरण करून श्री मडकईकर यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी या महान नेत्याच्या तत्वांचे पालन केले पाहिजे असे सांगितले.

‘भारताचे लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित एकता पदयात्रेचा उद्देश राष्ट्रीय एकता आणि राष्ट्रनिर्माणाला प्रोत्साहन देणे आणि नागरिकांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये नागरी जबाबदारीची भावना निर्माण करणे हा होता.

क्रीडा सचिव श्री संतोष सुखदेव, आयएएस, सहाय्यक संचालक (शारीरिक शिक्षण, उत्तर), श्री दिनेश देसाई आणि इतर उपस्थित होते.

सुरवातीस क्रिडा आणि युवा व्यवहार संचालक डॉ. अजय गावडे यांनी स्वागत केले तर उपसंचालक डॉ. विवेक पवार यांनी आभार मानले.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/८१२

Skip to content