श्री कामत यांच्याहस्ते काम व्यवस्थापनासाठी ई-साइन मॉड्यूलचा शुभारंभ
६ जानेवारी २०२६
सार्वजनिक बांधकाममंत्री श्री दिगंबर कामत यांनी ई-गव्हर्नन्स प्रकल्पाचा भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत बांधकाम व्यवस्थापनासाठी ई-साइन मॉड्यूलचा शुभारंभ करून सार्वजनिक बांधकाम खात्याने डिजिटायझेशनच्या दिशेने पावले उचलली आहेत असे सांगितले. ते आज पणजीतील आल्तिन येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
या उपक्रमामुळे ‘विकसित’ आणि ‘स्वयंपूर्ण गोंय’ चे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले. “डिजिटायझेशनने जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रवेश केला आहे आणि आपल्याला डिजिटल युगाबरोबर पुढे जाणे आवश्यक आहे म्हणूनच सार्वजनिक बांधकाम खात्याने वर्क्स मॅनेजमेंटसाठी हे ई-साइन मॉड्यूल सुरू केले आहे असे ते म्हणाले.
श्री कामत यांनी पुढे बोलतान सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये डिजिटायझेशन महत्त्वाचे आहे कारण पायाभूत सुविधांचा विकास हा सरकारच्या प्रगतीचा एक प्रमुख मापदंड आहे असे सांगितले. ई-मॉड्यूल प्रशासनात पारदर्शकता आणण्यास मदत करतात असे श्री कामत म्हणाले.
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते, अधिकारी आणि इतर उपस्थित होते.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१४

