Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

तारीख : २६ फेब्रुवारी २०२१

११ केव्ही ठाणे फिडरवर दि. १ मार्च २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत दुरूस्तीचे काम करायचे असल्याने हेदोदे डीटीसी भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

११ केव्ही बोंडला फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. १ मार्च २०२१ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत केंद्रीय हॉस्पिटल, मनोज इंजिनरींग, पीडीए मार्केट, अवंतीनगर, धावशिरे, सिने कमला कासयले, शैला बार आणि तळामळ भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे, ११ केव्ही उसगांव फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने १ मार्च २०२१ रोजी दुपारी २.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत लिफ्ट कंट्रोल, गावठण, शांतादुर्गा, प्राथमिक विद्यालय,मुर्डी, शांतादुर्गा, नाल्लाकोंड आणि मांडवी हॅचरीज भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे, ३३ केव्ही धाट फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. १ मार्च २०२१ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत खुटेमळ, मांडवी, तारचीमळ, आणि वोलदेव भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

असे माहिती आणि प्रसिद्धी खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/२२७

Skip to content