Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

विशेष मतदार यादी उजळणी २०२६

१३ जानेवारी २०२६

राज्य निवडणूक आयोगाने विशेष मतदीर यादी उजळणी मोहिमेंतर्गत तयार केलेला मतदार यादी मसुदा १६ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित करण्यात आला आहे.

ज्या मतदारांची नावे सदर मसुदा मतदार यादीत आहेत त्यांनी हे लक्षात ठेवावे की जर त्यांनी कोणत्याही विदेशी देशाचे नागरिकत्व घेतले असेल तर त्यांनी त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यासाठी अर्ज नमुना ७ भरून संबंधित निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांकडे सादर करावे. जर कोणतीही व्यक्ती भारताची नागरिक नसेल ती व्यक्ती लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५० च्या कलम १६(१)(अ) नुसार मतदार यादीत नोंदणीसाठी अपात्र ठरते.

याशिवाय जर एखादी व्यक्ती मतदार यादी तयार करणे, उजळणी करणे किंवा दुरुस्त करणे, किंवा मतदार यादीमध्ये समावेश किंवा त्यातून नाव वगळण्याबाबतीत चुकीची माहिती, जाहीरनामा देतो आणि ती माहिती, जाहीरनामा खोटी असल्याचे माहित आहे किंवा त्याला खोटे वाटत आहे किंवा ते खरे असल्याचे वाटत नाही अशा त्या व्यक्तीस लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५० च्या कलम ३१ नुसार एक वर्षापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होतील हेही लक्षात ठेवावे.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/३०

Skip to content