विधानसभा अधिवेशन काळात जमाव बंदीचा आदेश
११ जानेवारी २०२३
उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी राज्य विधानसभा अधिवेशन सत्र काळांत पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पाच्या सभोवतालच्या ५०० मिटर भागात आणि पणजी पोलीस स्टेशनच्या क्षेत्रांतील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, गल्ली, रस्ता, चौक किंवा कोणत्याही खुल्या जागेत पाच किंवा अधिक व्यक्ती जमा होण्यास आणि मिरवणूक काडण्यास किंवा आयोजित करण्यास, शस्त्रे किंवा लाठीं, तलवारी, भालें किंवा सुरा यासारखी शस्त्रें जवळ बाळगण्यास, लाऊडस्पिकरचा वापर करण्यास, घोषणा देण्यास आणि फटाके लावण्यास बंदी लागू केली आहे.
कामावरील लोकसेवक, परवानगी मिळविलेले लग्न सोहळे, अंतविधी किंवा कोणताही खास प्रसंग किंवा जिल्हा न्यायदंडाधिकारी, अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी, उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांच्या मताप्रमाणे विश्वसनीय प्रसंग ज्याना संबंधित जिल्हा न्यायदंडाधिकारी, अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी किंवा उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांकडून पूर्व लेखी परवानगी घेतली आहे त्यांना ही बंदी लागू नसेल.
हा आदेश १२ जानेवारी २०२६ रोजी लागू होईल आणि विधानसभा अधिवेशन सत्र संपेपर्यंत लागू राहील.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/२२

