लोकोत्सवात चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन
६ जानेवारी २०२६
कला आणि संस्कृती संचालनालयाच्यावतीने पश्चिम विभागिय सांस्कृतिक केंद्र उदयपूर यांच्या संयुक्त सहकार्याने दर्या संगम, कला अकादमी कांपाल येथे आयोजितकरण्यात येणाऱ्या वार्षिक राष्ट्रीय लोकोत्सवातगोव्यातील कलाकारांचे खास पेंटिंग्स प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. लोकोत्सवाची यशस्वी २५ वर्षे या संकल्पनेवर आयोजिक करम्यात येणाऱ्या चित्रकला प्रदर्शनात गोव्यातील कलाकारांना आपल्या कलेचे प्रदर्सन मांडण्याची संधी प्राप्त होईल.
कला अकादमीच्या कला दालनात हे प्रदर्शन मांडण्यात येईल. प्रदर्सनात मांडण्यासाठी पेंटिग्स, कलाकृती कमीत कमी १.५ फूट ते अधिकाधिक २.५ फूटाच्या असाव्या.
या कला प्रदर्शनात भाग घेण्यासाठी गोव्यातील चित्रकारांनी आपली पेंटिंग्स, कलाकृती १६ जानेवारी २०२६ पर्यंत कला अकादमीच्या कला दालनात सादर करावी. चित्रकारांनी आपली पेंटिंग्स, कलाकृतीच्या माहितीसह प्रवेशिकेसोबत सादर करावी. प्रवेशिका अर्ज आणि अधिक माहितीसाठी ०८३२२४०४६३०, २४०४६०६,६०० या क्रमांकावर संपर्क साधावा.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१३

