राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस साजरा
१२ जानेवारी २०२६
गोवा सरकारच्या नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने, व्ही.एम. साळगावकर कायदा महाविध्यालय मिरामारच्या ग्राहक कल्याण कक्षाच्या सहकार्याने, “डिजिटल न्यायाद्वारे कार्यक्षम आणि जलद निकाल” या संकल्पने अंतर्गत राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला भारतीय ग्राहक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनंत शर्मा हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याचे संचालक श्री. जयंत तारी, प्राचार्य व्ही.एम. साळगावकर कायदा महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. शबेर अली जी, गोवा राज्य जिल्हा ग्राहक तंटा निवारण आयोगाच्या सदस्या रचना ए.एम. गोन्साल्विस आणि उत्तर गोवा जिल्हा ग्राहक तंटा निवारण आयोगाच्या रेजिता राजन; प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याचे संचालक श्री जयंत तारी यांनी यावेळी बोलताना ग्राहक हक्क चळवळीच्या उत्क्रांतीवर प्रकाश टाकला. ऐतिहासिक न्यायालयीन निर्णय आणि ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ डिजिटल न्यायाचे महत्त्व प्रतिपादून त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना ग्राहक जागरूकता आणि नैतिक व्यवहारास प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. त्यांनी व्यापारी, व्यवसायिक आणि उद्योजकांना राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन कार्यक्रमात भाग घेण्याचे आवाहन केले. पोर्टलवर नोंदणी करून तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी जबाबदारी घेणे, ग्रहकांमध्ये विश्वास निर्माण करून प्रतिष्ठा वाढविणे, दीर्घकाळ चालणारे खटले जलद सोडविणे आणि ग्राहकांना अनुकूल वातावरण तयार करण्यास योगदान देण्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. अनंत शर्मा यांनी डिजीटल युगात ग्राहक संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यासाठी ग्राहक शिक्षण आणि सामूहिक जबाबदारीचे महत्त्व प्रतिपादले. ग्राहकांना सुलभ आणि जलद न्याय देण्यासाठी त्यांनी कार्यक्षम तक्रार निवारण प्रणालींची आवश्यकता यावर भर दिला. देशभरात सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर जागरूकता करण्यासाठी भारत यात्रा आयोजित केली जाणार आहे. या यात्रेच्या माद्यमातून तळागाळातील लोकांशी संपर्क साधून लोकांना शिक्षित करण्यात येईल उसे ते म्हणाले.
. यावेळी नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार संचालनालय आणि व्ही एम कायदा महाविध्यालयाच्या ग्राहक कल्याण विभागाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे वितरीत केली.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/२५

