राज्यपालांहस्ते डायलिसिस आणि कर्करोगाच्या रुग्णांना आर्थिक मदत वितरीत
१३ जानेवारी २०२६
राज्यपाल श्री पुसापती अशोक गजपती राजू यांनी लोकभवन येथे २०० हून अधिक डायलिसिस आणि कर्करोग रुग्णांना आर्थिक मदतीचे वाटप केले. ही मदत राज्यपालांच्या विवेकाधीन निधीतून दिली जाते. ही पद्धत माजी राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई यांनी सुरू केली होती आणि सध्याच्या राज्यपालांनीही ती सुरू ठेवली आहे, अशी माहिती राज्यपालांचे सचिव श्री अर्जुन मोहन, आयएएस यांनी त्यांच्या स्वागतपर भाषणात दिली.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/३२

