राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना होळीच्या शुभेच्छा
२ मार्च २०२६
गोव्याचे राज्यपाल श्री पुसापती अशोक गजपती राजू यांनी होळीच्या शुभ मुहूर्तावर गोव्यातील सर्व जनतेला होळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, “रंगांचा उत्सव होळी हा वसंत ऋतूच्या आगमनाचे आणि नूतनीकरण, आशा आणि वाईट प्रवृत्तीवर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. होळी हा सण आपल्याला सत्य, नीतिमत्ता आणि विविधतेत एकता या चिरस्थायी मूल्यांची आठवण करून देतो. या सणाशी संबंधित कथा आपल्याला आपल्या श्रद्धेत दृढ राहण्याची, नैतिक मूल्यांचे समर्थन करण्याची आणि जे योग्य आहे त्यासाठी धैर्याने उभे राहण्याची प्रेरणा देते, शेवटी नकारात्मकतेवर चांगुलपणाचा विजय होतो हे पुन्हा एकदा सिद्ध करते.”
राज्यपाल पुढे म्हणतात, “हा आनंदाचा प्रसंग साजरा करताना, मी सर्वांना सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने होळी साजरी करण्याचे आवाहन करतो. आपण नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक रंगांचा वापर करूया, पाण्याचे जतन करूया आणि आपल्या उत्सवांमुळे इतरांना किंवा निसर्गाला हानी पोहोचणार नाही याची खात्री करूया, ज्यामुळे भावी पिढ्यांसाठी एक सकारात्मक उदाहरण निर्माण होईल.”
होळीचा उत्साह आपल्या सर्वांच्या जीवनात शांती, प्रगती आणि सकारात्मकतेचे उजळण करो. मी पुन्हा एकदा गोव्यातील सर्व नागरिकांना माझ्याकडून होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१५०
