Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना गोवा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा १८ डिसेंबर २०२५

गोव्याचे राज्यपाल श्री पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोव्याच्या मुक्ती दिनानिमित्त गोव्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत .

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, गोवा मुक्ती दिनाच्या या ऐतिहासिक प्रसंगी, मी गोव्यातील लोकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आज मुक्ती दिनाच्या या ऐतिहासिक प्रसंगी मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की गोव्यातील राजभवन हे लोकभवन गोवा म्हणून ओळखले जाईल. हा बदल वसाहतकालीन शब्दावलीपासून एक जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक पाऊल आहे आणि आपल्या लोकशाही प्रजासत्ताकाच्या मूल्यांमध्ये रुजलेल्या नामकरणाप्रती आपली वचनबद्धता मजबूत करते. “लोकभवन” म्हणजे लोकांचे घर, जे पारदर्शकता, समावेशकता आणि गोव्यातील नागरिकांची सेवा करण्यासाठी आपल्या अढळ समर्पणाचे प्रतीक आहे. लोकभवन लोकांची सेवा करण्यासाठी वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करते, ती एक अशी संस्था आहे जिथे प्रत्येक नागरिकांच्या मनात आपलेपणाची भावना आहे. हे केवळ प्रशासकीय अधिकाराचे आसन नाही तर ते प्रत्येक गोमंतकीयांच्या आशा, अपेक्षा आणि विश्वासाचे स्थान आहे. लोकभवन खरोखरच लोकांसाठी, लोकांसोबत आणि लोकांच्या सेवेत काम करील.”

राज्यपाल पुढे म्हणतात १९ डिसेंबर १९६१ हा गोव्याच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे, या दिवशी गोवा पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाले आणि भारताचा अंतर्गत भाग झाला. हा असा दिवस आहे ज्या दिवशी आपण आपल्या दीर्घ आणि कठीण स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या असंख्य बलिदानांचे स्मरण करून त्यांचा सन्मान करतो. हा ऐतिहासिक प्रसंग स्वातंत्र्याच्या काळातील एकता, साहस आणि त्यागाचे स्मरण करून देतो. हा दिवस आपल्याला गोव्याच्या समृद्ध वारशाची आणि सक्षम आणि प्रगतीशील राज्य बनण्याच्या दिशेने केलेल्या उल्लेखनीय प्रवासाची एक शक्तिशाली आठवण करून देतो.

आपल्या सर्वांना माहिती आहे की गोवा ४५० वर्षांहून अधिक काळ वसाहतवादी अधिपत्याखाली होता. या दीर्घ आणि कठीण काळात गोव्यातील अनेक पिढ्यांनी सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय आव्हानाना तोंड दिले. जरी ही भूमी सुंदर असली तरी गोव्यातील लोक स्वायत्तता आणि प्रतिष्ठेशिवाय जगत होते, जो प्रत्येक मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे. तरीही दडपशाहीच्या या दीर्घकाळाच्या दबावाखाली गोव्यातील काहीं लोकांनी निर्धारपूर्वक आणि बंड करण्यास सुरवात केली.
आम्ही सुरुवातीच्या काळात झालेल्या प्रतिकार बंडाचा आम्ही आदराने आठवण करतो. असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांचा त्याग आणि अढळ दृढनिश्चयाने स्वातंत्र्याचे पहिले बीज पेरले आणि ज्या बीजांनी मोठ्या झाडात वाढ होऊन स्वातंत्र्यात रूपांतर झाले, जो दिवस आज आपण साजरा करतो असे राज्यपाल म्हणतात.

डिसेंबर १९६१ मध्ये ऐतिहासिक “ऑपरेशन विजय” ही सैन्य दलाने केलेली कारवाई गोवा मुक्तीचे शेवटचे वळण ठरले. जेव्हा सर्व राजनैतिक मार्ग संपले होते आणि मुक्तीची मागणी राष्ट्राचा आवाज बनली तेंव्हा गोवा, दमण आणि दीव यांना वसाहतवादी राजवटीपासून मुक्त करण्यासाठी भारतीय सैन्य दले, आपले धाडसी लष्कर, नौदल आणि हवाई दलाने शिग्र आणि निर्णायक कारवाई केली. ऑपरेशन विजय” ही केवळ लष्कराची कारवाई नव्हती. १९४७ मध्ये उर्वरित भारताने मिळविलेल्या स्वातंत्र्याच्या समान स्वातंत्र्यास गोव्यातील लोक पात्र आहेत. ही कारवाई फक्त ३६ तास चालली, परंतु त्या तासांच्या प्रभावाने या भूमीचे नशीब कायमचे बदलले. पणजी शहरावर भारतीय तिरंगा फडकतानाचे दृश्य केवळ वसाहतवादी राजवटीचा अंतच नव्हे तर एका नवीन युगाची पहाट झाली, ज्यामध्ये गोवेकर सक्षम आणि सार्वभौमत्व भारताचा अविभाज्य भाग म्हणून आपली ओळख, आपली संस्कृती आणि आपल्या भविष्याचा विचार करू शकतील,” असे राज्यपाल पुढे म्हणतात.

गोवा मुक्ती दिन हा केवळ आपल्या भूतकाळाची आठवण नाही तर तो आपण केलेल्या प्रगतीचा आढावा घेऊन आनंदाने साजरा करण्याचा हा दिवस आहे. गेल्या काही दशकांमध्ये, गोवा सलोखा, शिक्षण, सांस्कृतिक समृद्धी आणि शाश्वत विकासाचे एक आदर्श राज्य बनले आहे. “या वर्षी, गोव्याने उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. या वर्षी, गोव्याने १०० टक्के साक्षरतेचा टप्पा गाठला आहे, जो देशातील काही पूर्णपणे साक्षर राज्यांपैकी एक बनला आहे. हा आपल्या सशक्तीकरणाच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. यातून केवळ वाचन आणि लेखन करण्याची क्षमताच दिसून येत नाही तर प्रत्येक गोव्याच्या नागरिकांसाठी मानवी क्षमता, प्रतिष्ठा आणि संधीचा मार्ग खुला होतो.

पर्यटन हा गोव्याच्या विकासाचा एक आधारस्तंभ आहे. २०२५ मध्ये, राज्यात तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या आगमनात लक्षणीय वाढ झाली आहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, आम्ही पर्यटनाला एका शाश्वत आणि समावेशक विकास करण्यावर भर दिला आहे. “गोव्यात बीच पर्यटनाच्या पुढे जाऊन वारसा पर्यटन, हिंटरलेंड पर्यटन, इको-टुरिझम, ग्रामीण पर्यटन आणि वेलनेस पर्यटनाच्या विकासास प्रोत्साहन देत आहे. पर्वरी टाउन स्क्वेअर, सांस्कृतिक आणि नैसर्गिक स्थळांचे सुशोभीकरण करून अधिक लोककेंद्रित आणि पर्यावरण सुरक्षित पर्यटनावर भर दिल्याचे दिसून येते.

हरित ऊर्जा निर्माण, ऊर्जा-कार्यक्षम वाढ आणि हवामान-लवचिक भविष्य निर्माण करणे यासाठी. स्वच्छ उर्जा रोडमॅप २०२५ चालीस लाऊन गोव्याने एक ऐतिहासिक पाऊल उभारले आहे. या प्रकल्पाखाली नवीनिकरण उर्जा वापर, राज्यभर सोलर रूफटॉप प्रकल्प वाढ, उर्जा सकारात्मक गांव, हरित स्वयंपाक कार्यक्रम आणि आरोग्य सुविधांचे सौरीकरण यावर लक्ष केंद्रित केले आहे. विकासाच्या मार्गावर पुढे जाताना गोव्याचे सुंदर पर्यावरण, आपल्या नद्या, टेकड्या, जंगले आणि किनारपट्टीचे जतन करण्याच्या आपली जबाबदारी या प्रयत्नांतून दिसून येते.

अलिकडच्या वर्षांत, गोव्याने क्रीडा विकासातही उल्लेखनीय प्रगती केली आहे. गोव्यातील तरुण खेळाडूंनी फुटबॉल, पोहणे, अ‍ॅथलेटिक्स, मार्शल आर्ट्स आणि इतर अनेक खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून त्यांनी पदके आणि प्रसिद्धी मिळवून राज्याला अभिमान मिळवून दिला आहे. त्यांची कामगिरी गोव्याच्या उत्साही आणि सतत वाढणाऱ्या क्रीडा भावनेचा एक तेजस्वी पुरावा आहे.

आम्ही हा दिवस साजरा करताना, गोव्याच्या स्वातंत्र्यात योगदान देणाऱ्या प्रत्येक ज्ञात-अज्ञात शूर आणि पराक्रमी आत्म्यास आदरांजली वाहूया. ऑपरेशन विजय अचूकतेने आणि सन्मानाने राबवणाऱ्या आपल्या सैनिकांच्या धाडसाला आपण सलाम करूया. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्या राष्ट्राची व्याख्या करणाऱ्या न्याय, एकता आणि प्रगतीच्या आदर्शांप्रती आपली समर्पित भावना मजबूत करूया.

आजच्या या महत्त्वपूर्ण दिवशी, आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा आणि बलिदान दिलेल्या सर्वांच्या स्मृतींना आदरांजली वाहताना, मी गोव्यातील लोकांना आपल्या राज्याचे आणि राष्ट्राचे समृद्ध, चैतन्यशील भविष्य घडविण्यासाठी स्वतःला पुन्हा समर्पित करण्याचे आवाहन करतो,” असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/८६३

Skip to content