राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना ईस्टरच्या शुभेच्छा
४ एप्रिल २०२६
गोव्याचे राज्यपाल श्री. पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोव्यातील लोकांना विशेषत: ख्रिश्चन बांधवांना ईस्टरच्या हार्दिक शुभेच्या व्यक्त केल्या आहेत
आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, ईस्टरच्या शुभप्रसंगी मी गोव्यातील लोकांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. ईस्टरचा सण हा शांततेचा प्रेषित येशू ख्रिस्ताच्या गौरवशाली पुनरुत्थानाचा दिवस म्हणून ईस्टर साजरा केला जातो. येशू ख्रिश्तांना क्रॉसवर मारल्यानंतर तीन दिवसांनी येशू ख्रिश्तांचे पुनरुत्थान झाले. ईस्टर हा एक पवित्र आणि महत्त्वपूर्ण सण आहे, जो आशा, नवीनीकरण आणि संकटांवर मिळविलेल्या जीवनाच्या विजयाचे प्रतीक आहे. ईस्टर आपल्याला करुणा, क्षमा आणि श्रद्धा या मूल्यांची आठवण करून देतो, जी मुल्ये सलोख्याचा आणि सर्वसमावेशक समाज घडविण्यासाठी आवश्यक आहेत.
आजच्या या शुभप्रसंगी, येशू ख्रिस्ताने दाखविलेल्या मार्गावर चालण्याची आणि आपल्याला एकत्र बांधणाऱ्या मूल्यांना जपून आपल्या राज्याच्या निरंतर प्रगती व समृद्धीसाठी प्रयत्न करण्याची आपली वचनबद्धता आपण पुन्हा एकदा दृढ करूया. आपल्या राज्याच्या प्रगती आणि भरभराटीसाठी आपण प्रयत्न करूया.
ईस्टर सण आपण सर्वाना आनंद आणि आशिर्वाद घेऊन येवो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.
मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/२२१
