म्हापसा येथे प्रजासत्ताक दिन साजरा
२६ जानेवारी २०२६
पर्यटन, महसूल आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खवंटे यांनी म्हापसा जिल्हा मुख्यालयात ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय तिरंगा फडकविला.
या प्रसंगी बोलताना मंत्री श्री खवंटे यांनी हा दिवस केवळ स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची मूलभूत तत्त्वे स्थापित करणाऱ्या भारतीय संविधानाचा स्वीकार आणि अंमलबजावणी साजरा करण्याचा दिवस नाही तर आपल्या देशाला स्वावलंबी बनविण्याच्या आपल्या संकल्पाला बळकटी देण्याचाही आहे असे सांगितले. श्री खंवटे यांनी आपण देशाच्या संविधानाप्रती समर्पित होऊन आपल्याला संविधानाने दिलेल्या अधिकाराचा जबाबदारीने उपयोग करण्याचा आणि देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी स्वता निर्धार करम्याच् वाहन केले. पुढे बोलताना श्री खवंटे यांनी सरकार सेंद्रिय शेती आणि जलसंधारण उपक्रमांसारख्या सुविधांद्वारे शेतकरी समुदायाला मदत करीत आहे असे सांगितले. गोवा सरकारने प्रगतीच्या क्षेत्रात पावले उचलताना लोकांच्या फायद्यासाठी म्हजे घर सारख्या अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्याचे सांगितले. म्हजे घर ही योजना गरीब आणि सामान्य लोकांना आपल्या घराचा कायदेशीरहक्क मिळवून देण्यास फायदेशीर ठरेल असे ते म्हणाले. .
विकसित भारत ग्रामीण योजना सारख्या नियोजनातील योजना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मदत करतील असे ते म्हणाले.
पर्यटन आणि धोरणांमध्ये सुधारणा करून जबाबदार पर्यटन धोरणे लागू करण्याचा प्रयत्न करीत आहे. कोविडनंतर पर्यटकांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करीत आहोत असे श्री खवंटे म्हणाले.
याप्रसंगी कला, संगीत इत्यादी विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार श्री गुरुदास सावळ, श्री शेखर वायंगणकर, श्री व्यंकटेश शंकवाळकर, स्व. गुरुदास सिंगबाळ, श्री सतीश नाईक आणि श्री प्रमोद खांडेपार्कर यांचा समावेश होता.
उपजिल्हाधिकारी श्रीमती वर्षा परब, उपजिल्हाधिकारी-२ वसंत प्रसाद दाभोलकर, बार्देशचे मामलेदार श्री अनंत मळिक, इतर सरकारी अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/

