मुख्य सचिवांकडून राज्यातील एलपीजी सिलिंडर पुरवठ्याचा आढावा घरगुती ग्राहकांना घाबरण्याची गरज नाही
१२ मार्च २०२६
मुख्य सचिव डॉ. व्ही. कँडावेलू यांनी आज आयओसीएल, एचपीसीएल आणि बीपीसीएल या तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींसह राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि राज्यातील एलपीजी सिलिंडर पुरवठ्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि राज्यातील एकूण परिस्थिती चांगली आहे आणि एलपीजी सिलिडर साठा भरपूर असल्याने घरगुती ग्राहकांना गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले.
या बैठकीला नागरी पुरवठा सचिव श्री संजीव गडकर, आयएएस, आयजीपी, श्री के.आर चौरासिया, आयपीएस, दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, श्री अंकित यादव, आयएएस आणि एग्ना क्लीटस, आयएएस, नागरी पुरवठा संचालक, श्री जयंत तारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
एलपीजी सिलिंडर पुरवठ्यासंबंधी लोकांमध्ये भीती कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी, तालुका उपजिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी एलपीजी सिलिंडर पुरवठ्यावर लक्ष ठेऊन लोकांना खऱ्या परिस्थितीची माहिती देण्यास सांगितले. त्याचप्रमाणे घरगुती ग्राहकांना सुरळीत गॅस सिलिंडर वितरण करण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी तेल कंपन्यांना आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश देण्यात आले. ग्राहकांकडून एलपीजी खरेदी आणि साठेबाजी रोखण्यासाठी जनतेला जागरूक करण्याची गरजही प्रतिपादली.
तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मुख्य सचिव आणि इतर सदस्यांना त्यांच्याकडे असलेल्या गॅस सिलिंडर साठ्याच्यात तसेच पुरवठा आणि राज्यात गॅस सिलिंडर पुरवठा कमी होऊ नये म्हणून केलेल्या उपायांची माहिती बैठकीत देण्यात आली.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१८०
