मुख्यमंत्र्यांकडून गोव्यातील लोकांना गोवा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा १८ डिसेंबर २०२५
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना गोवा मुक्ती दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी गोवा मुक्तीसाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना स्मृतीस आदरांजली वाहिली आणि राज्य सरकार स्वातंत्र्य, प्रतिष्ठा आणि एकता या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे म्हणतात.
आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, गोवा मुक्ती दिन हा केवळ स्वातंत्र्यासाठी केलेल्या आपल्या ऐतिहासिक स्वातंत्र्यलढ्याची आठवण करून देणारा नाही तर गोव्याने मानवी प्रयत्नांच्या क्षेत्रात केलेल्या विकास, सलोखा आणि संस्कृतिक लोकांचा उत्सव आहे. गोव्यातील प्रत्येक नागरिकांने राज्याच्या प्रगती आणि समृद्धीसाठी सक्रिय योगदान देऊन वारशाचा साभाळून ठेवण्याचे आवाहन केले.
सरकारच्या प्रमुख उपक्रम स्वयंपूर्ण गोंवावर प्रकाश टाकत, मुख्यमंत्र्यांनी आर्थिक सक्षमीकरण, स्थानिक उद्योजकता, कौशल्य विकास आणि समुदाय-चालित वाढीसाठी उपलब्ध असलेल्या संधींचा फायदा घेण्याचेही आवाहन केले. आपण आपल्या गावांच्या, आपल्या समुदायांच्या आणि आपल्या राज्याच्या विकासासाठी स्वतःला पुन्हा समर्पित करूया असे मुख्यमंत्री म्हणतात.
गोव्याच्या लोकांनी राज्याच्या शाश्वत विकासासाठी योगदान देऊन गोव्याला स्वयंपूर्ण राज्य करण्याच्या सरकारच्या प्रयत्नाना हातभार लावण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी सर्व नागरिकांना आनंदी आणि अभिमानास्पद गोवा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा दिल्या!
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/८६२

