मुख्यमंत्र्यांकडून गोव्यातील लोकांना सेंट फ्रान्सिस झेव्हियर फेस्ताच्या शुभेच्छा
२ डिसेंबर २०२२
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्तानिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. राज्यात सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्त मोठ्या भक्तीभावाने साजरे केले जाते.
आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात “सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या फेस्ताला गोव्यातील आणि जगभरातील भक्तांच्या हृदयात एक विशेष स्थान आहे. हजारो भाविक श्रद्धेने आणि भक्तीने फेस्तला येतात आणि प्रार्थना सभांना हजर राहतात त्यामुळे एकता आणि सलोख्याची भावना निर्माण होते.
हा पवित्र प्रसंग प्रत्येक घरात नवीन आशा आणि आनंद घेऊन येवो असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/८३५

