मुख्यमंत्र्यहस्ते पिंटो बंडाच्या हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली
१३ डिसेंबर २०२५
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पिंटो बंडाच्या स्मरणार्थ पणजीतील साल्वाडोर डिसोझा गार्डन येथील पिंटो बंडाच्या हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली वाहिली. याप्रसंगी मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलु , आयएएस, उत्तर गोवा जिल्हाधिकारी श्री अंकित यादव, आयएएस, पोलिस महानिरीक्षक श्री के.आर. चौरसिया, स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री. रोहिदास देसाई आणि इतर उपस्थित होते.
पोलिस पथकाने स्मारकाला मानवंदना दिली आणि लास्ट पोस्ट धून आळविली आणि राष्ट्रगीत वाजवले.
पिंटो बंड हे १७८७ मध्ये गोव्यात पोर्तुगीज राजवटीविरुद्ध झालेले बंड होते आणि ते स्वातंत्र्य चळवळीत इतरांना सामील होण्यासाठी प्रेरणा देणारे होते.
मा वाप दिबा एपी र ना २०२५.

