मानसिक आजार, आत्महत्येच्या प्रकरणांचा अहवाल देताना माध्यमांनी पीसीआय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे
६ फेब्रुवारी २०२६
उच्च शिक्षण संचालनालयाने मानसिक आजार, आत्महत्येच्या प्रकरणांची बातमी देताना माध्यमानी पीसीआय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला दिला. मानसिक आजाराशी संबंधित बातम्यांचे प्रकाशन/रिपोर्टिंग करण्याविषयी मानसिक आरोग्य सेवा कायदा, २०१७ च्या कलम २४(१) नुसार, मंडळाने माध्यमांनी मानसिक आजार असलेल्या व्यक्तीच्या संमतीशिवाय मानसिक आरोग्य संस्थेत उपचार घेत असलेल्या व्यक्तीचे छायाचित्र किंवा इतर कोणतीही माहिती प्रकाशित करू नये हा नियम स्वीकारला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आत्महत्या रोखण्याच्या अहवालाच्या अनुषंगाने मीडिया व्यावसायिकांसाठी एक संसाधन – २०१७ च्या अहवालास अनुसरून मंडळाने मार्गदर्शक तत्वे स्वीकारली असून वृत्तपत्रे आणि वृत्तसंस्थांनी आत्महत्या प्रकरणांचे वृत्तांकन करताना आत्महत्येबद्दलच्या बातम्या प्रमुखपणे प्रकाशित करू नयेत आणि अशा बातम्यांची अनावश्यक पुनरावृत्ती करू नये, आत्महत्येला खळबळजनक करणारी भाषा वापरू नये किंवा समस्यांवर उपाय म्हणून ती सादर करू नये, आत्महत्येस वापरलेल्या पद्धतीचे, साइट/स्थानाबद्दल तपशील, खळबळजनक मथळे, छायाचित्रे, व्हिडिओ फुटेज किंवा सोशल मीडिया लिंक्स वापर टाळावा.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/११०

