महिला आणि बाल विकास खात्याकडून कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध कायद्याखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश
१२ नोव्हेंबर २०२५
कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध कायदा, २०१३ च्या आदेशानुसार महिला आणि बालविकास खात्याने गोवा राज्यातील दोन्ही जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी कार्यालये, अनुदानित संस्था, संघटना, संस्था, औद्योगिक अस्थापने, शैक्षणिक संस्था, खाजगी क्षेत्रातील संस्था, रुग्णालये, क्रीडा संस्थामध्ये अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या कार्यालयामध्ये अंतर्गत तक्रार समितीची स्थापना केली नाही त्यांना लवकरात लवकर करण्याचे सांगितले आहे.
अंतर्गत तक्रार समितीची स्थापना केल्याची माहिती आणि अहवाल संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांना देण्याची आणि नोडल अधिकारी आणि अंतर्गत समित्यांची आवश्यक माहिती महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या she-b0x portal वर अपलोड करम्याचा आदेश दिला आहे.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/८११

