Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

फोंडा विधानसभा पोट निवडणूुकीसाठी सर्वसामान्य निरीक्षकांची नियुक्ती

२३ मार्च २०२६

फोंडा विधानसभा पोटनिवडणूुकीसाठी भारतीय निवडणूक आयोगाने पुूजा पार्थ, आयएएस यांची सर्वसामान्य निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. निवणूकीसंबंधी कोणतेही प्रश्न असल्यास ते सोडविण्यासाठी निरीक्षक सर्वसामान्य जनता, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि उमेदवारांसाठी सोमवार आणि गुरूवार रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत कोर्ट रूम, अतिरीक्त जिल्हाधिकारी-३, दुसरा मजला, सरकारी इमारत प्रकल्प, तिस्क फोंडा येथे उपलब्ध असतील. निरीक्षकांचा संपर्क क्रमांक ७७५७९१२२४१ असा आहे. निवडणूकीसंबंधी कोणत्याही तक्रारी किंवा सूचना असल्यास निरीक्षकांकडे संपर्क साधावा.

मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/१९६

Skip to content