Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

पोलिस महासंचालक, महानिरीक्षकांची राज्यस्तरीय परिषद संपन्न

३ फेब्रुवारी २०२६

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली गोवा पोलिसांनी आयोजित केलेल्या पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षकांची राज्यस्तरीय परिषद २०२५ आज पणजी येथे संपन्न झाली.

परिषदेत मुख्यमंत्र्यांनी डिचोली पोलीस स्टेशनला २०२५ सालासाठी भारतातील उत्कृष्ठ पोलीस स्टेशनमध्ये पाचवे स्थान मिळविल्याबद्दल त्यांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी आणि सार्वजनिक सेवेतील वचनबद्धतेची दखल घेऊन उत्कृष्टता प्रमाणपत्र देऊन गौरविले.

या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी पोलीस यंत्रणा मजबूत करणे आणि तांत्रिक क्षमता वाढविणे या उद्देशाने दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ केला. यामध्ये सायबर आर्थिक फसवणूक प्रकरणांसाठी ई-झिरो एफआयआर मॉड्यूल आणि प्रिझम (प्रोअॅक्टिव्ह रिस्क आयडेंटिफिकेशन अँड सर्व्हेलन्स मेकॅनिझम) – इंटेलिजेंट फ्यूजन सेंटर यांचा समावेश आहे.

या परिषदेला गोव्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू, आयएएस, पोलिस महासंचालक श्री आलोक कुमार, आयपीएस, पोलिस महानिरीक्षक श्री केशव राम चौरसिया, आयपीएस, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, खाते प्रमुख, प्रमुख भागधारक आणि गोवा पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/९७

Skip to content