पोटनिवडणुक वार्डातील मतदार कामगारांना भरपगारी सुटी जाहीर
२६ फेब्रुवारी २०२६
चांदेल- हंसापूर ग्राम पंचायतीच्या प्रभाग क्रमांक १, मांद्रे ग्राम पंचायतीच्या प्रभाग क्रमांक ४, पिळगांव ग्राम पंचायतीच्या प्रभाग क्रमांक ७, लाटंबार्से ग्राम पंचायतच्या प्रभाग क्रमांक ३, पिळर्ण मार्ना ग्राम पंचायतीच्या प्रभाग क्रमांक १, सिरसई ग्राम पंचायतीच्या प्रभाग क्रमांक ६, साल्वादोर द मुंद ग्राम पंचायतीच्या प्रभाग क्रमांक २, कांदोळी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १, आके बायश ग्राम पंचायतीच्या प्रभाग क्रमांक ६, बोरी ग्राम पंचायतीच्या प्रभाग क्रमांक १, वेलींग प्रियोळ ग्राम पंचायतीच्या प्रभाग क्रमांक ३, भोमा अडकोण ग्राम पंचायतीच्या प्रभाग क्रमांक ३, बाळ्ळी- अडणे ग्राम पंचायतीच्या प्रभाग क्रमांक ८ आणि लोलयें- पोळे ग्राम पंचायतीच्या प्रभाग क्रमांक ८ साठी ८ मार्च २०२६ रोजी पोटनिवडणूक होणार असून पोटनिवडणूक होणाऱ्या वार्डातील मतदार असलेल्या औद्योगिक कामगार, सरकारी खाते आणि औद्योगिक विभागांमध्ये दैनंदिन वेतनावर काम करणारे कामगार, खाजगी व्यापारी आस्थापनांमध्ये काम करणारे आणि इतर खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांसाठी मतदानाच्या दिवशी सरकारने ८ मार्च २०२६ रोजी भरपगारी सुटी जाहीर केली आहे.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१४५
